KDE 4.0 Released
Friday, 11 January 2008
के.डी.ई. प्रकल्पाच्या मुक्त डेस्कटॉप्चे चौथी आवृत्ती उपलब्ध!
ह्या चौथ्या मुख्य आवृत्तीबरोबरच के.डी.ई. समाजाचे नवीन पर्व सुरू झाले आहे.
के.डी.ई. ४.०.० ची त्वरित उपलब्धता जाहिर करताना संपूर्ण के.डी.ई. समाजाला अत्यंत आनंद आहे. ही महत्वपूर्ण उन्नती के.डी.ई. समाजानी केलेल्या दीर्घ आणी तीव्र विकासांचे फळ आहे.
सर्वात मोठी सुधारणा के.डी.ई. ४.० च्या प्रणालीकोषा मधे केलेली आहे. "फोनॉन" ही बहुमाध्यमिक संरचना सर्व के.डी.ई. प्रणालीना हार्डवेअर-स्वतंत्र बहुमाध्यमिक क्षमता देते. "सॉलिड" हार्डवेअर-संघटन संरचना ही अस्थायी यंत्र वापरणे व ऊर्जा-प्रबंधन करणे सोयीचे करते.
के.डी.ई. ४ डेस्कटॉप ला बर्याच नवीन क्षमता मिळाल्या आहेत. "प्लाझमा" डेस्कटॉपला फलक, प्रणालीसूची, व डेस्कटॉप उपकरणे, तसेच उपकरण-पडदा मिळाला आहे. "के-विन" विंडो-नियंत्रकतल्या प्रगत चित्र-करामतींमुळे आपले काम सुखद आणी सुरळीत होते.
के.डी.ई. च्या सर्व प्रणालींमधे भरपुर सुधारणा झालेली आहे. सदिष चित्रकलेवर आधारित चित्र करामती, मूलभूत प्रणलीकोषांमधे सुधरणा, नवीन प्रणली व इतर बरीच नवीन वैशिष्ट्य के.डी.ई. ४ मधे आहेत. या सर्व प्रौद्योगिक सुधारणांची २ उतकृष्ठ उदाहरणे म्हणजेच नवीन दस्तावेज प्रणाली "ऑक्युलर", व दस्तावेज प्रबंधक "डॉलफिन"
ऑक्सिजन चित्रकला गटाने डेस्कटॉपचे सौंदर्य वाढविले आहे. के.डी.ई. डेस्कटॉपची जवळजवळ सर्व प्रणाली दृश्य पूर्णतः बदलली आहेत. सौंदर्य व सुसंगतता हे ऑक्सिजन गटाचे महत्वपूर्ण उद्देश आहेत.
डेस्कटॉप
- "प्लाझमा" हा नवीन डेस्कटॉप फलक, प्रणालीसूची, व इतर डेस्कटॉप उपकरणांमार्फत संगणकाचा वापर सरल करतो.
- "के-विन" विंडो-नियंत्रक आता विकसित प्रणाली दृश्य दाखवतो. हार्डवेअर सहायक दृतचित्रकला प्रणाली व डेस्कटॉपचा वापर सरल करते.
- के.डी.ई. ४ ची नवीन "ऑक्सिजन" चित्रकला सर्व प्रणाली दृश्य सुसंगत व सुंदर करते.
के.डी.ई. च्या नवीन डेस्कटॉपची अधिक माहिती के.डी.ई. ४.० प्रणाली दृश्य मार्गदर्शकात मिळू शकते.
प्रणाली
- कॉंकरर म्हणजेच के.डी.ई. चा सिद्ध इंटरनेट ब्राऊझर. कॉंकरर छोटा व चपळ असून सर्व नवीन मानक (जसे की सी.एस.एस. ३) पाळतो.
- के.डी.ई. चा नवीन दस्तावेज प्रबंधक म्हणजेच डॉलफिन. डॉलफिनचे आरेखन त्याची उपयोगिता लक्षात घेउन केले असल्यामुळे त्याचा वापर प्रभावी असून वापरायला अतीशय सोपा आहे.
- प्रणाली समायोजनाकरिता नवीन प्रकारचे नियंत्रणकेंद्र बनवले आहे. "के सिसगार्ड" मधील या सुधारणा सर्व प्रणाली व साधनांच्या निरीक्षणात व नियंत्रणात सरलता आणतात.
- के.डी.ई. ४ ची दस्तावेज प्रणाली ऑक्युलर बर्याच प्रकारचे दस्तावेज दाखवू शकते. ऑक्युलर मधील सुधारणा या OpenUsability Project च्या सहायतेनी केलेल्या सुधारणांपैकी एक आहे.
- के.डी.ई. ४ संरचनेत सर्वप्रथम शिक्षणप्रणाली बनवल्या. या रत्नांतच आहेत रसायनशास्त्राची आवर्तसारणी शिकवायला कँलझियम, व भूगोलासाठी मार्बल पृथ्वी. शिक्षणप्रणालीची अधिक माहिती या शिक्षणप्रणाली मार्गदर्शकात उपलब्ध आहे.
- के.डी.ई. मधील केमाईन्स, केपँट, व इतर बरेच खेळ सुधारले आहेत. सदिश चित्रकला आधारित हे खेळ आता चित्रांश-घनतेवर अवलंबून नाहीत.
प्रणालीकोष
- फोनॉन मार्फत सर्व के.डी.ई. प्रणालीना बहुमाध्यमिक क्षमता (जसे की गाणी वाजवणे अथवा चलचित्र दाखवणे). फोनॉनची आंतरिक प्रक्रिया उपस्थित संरचनांपैकी कोणतीही वापरू शकते, तर सामान्यतः झाईन (Xine) संरचना वापरली आहे.
- "सॉलिड" हार्डवेअर-संघटन संरचना स्थायी व अस्थायी यंत्र वापरणे, तसेच ऊर्जा-प्रबंधन करणे सोयीचे करते. याशिवाय सॉलिड नेटवर्क, वायरलेस नेटवर्क व ब्लूटूथ सहजपणे वापरण्याकरिता शैली उपलब्ध करते. याकरिता दिलेली सामान्य प्रणाली जर आपल्याला बदलायची गरज पडली तरी असा बदल उर्वरित प्रणाली बंद न करता करू शकता.
- कॉंकररची आंतरिक वेबपेज दाखवण्याची प्रक्रिया म्हणजेच के.एचटीएमएल (KHTML). KHTML छोटा व चपळ असून सर्व नवीन मानक (जसे की सी.एस.एस. ३) पाळतो.
सर्वमान्य ए.सी.आय.डी.२ परीक्षा सर्वप्रथम KHTML पास झाला.
- के.डी.ई. बरोबरचा "थ्रेडवीव्हर" प्रणालीकोष हा अलीकडे मिळू लागलेल्या बहुआंतरिक संगणकाचा पुरेपूर उपयोग करू शकतो. यामुळेच
सर्व प्रणाली वापरणे आनंददायक होते, तसेच सर्व साधनांचा निपुण वापर होतो.
- ट्रोलटेकच्या क्यू.टी. ४ प्रणालीकोषावर आधारित के.डी.ई. ४ मधे बर्याच आधुनिक चित्रक्षमता असून कमी स्मृतीक्षमता आवश्यक आहे. क्यू.टी. प्रणालीकोषाचा पूरक के.डी.ई. प्रणालीकोष हा अभियांत्रिकांना क्रियात्मकता व सुविधा पुरवतो.
के.डी.ई. च्या टेक बेस माहितीसंग्रहात के.डी.ई. प्रणालीकोषाची अतिरिक्त माहिती उपलब्ध आहे.
के.डी.ई. ४ ची मार्गदर्शित सैर...
के.डी.ई. ४ - मार्गदर्शित सैर मधे के.डी.ई. च्या नवीन व आधुनिक प्रौद्योगिक सुधारणांचा सारांश आहे. सचित्र स्पष्टीकरणासह आपल्याला के.डी.ई. मधील सुधारणा तसेच नवीन वैशिष्ट्य बघायला मिळतील. सर्वप्रथम डेस्कटॉपची वैशिष्ट्य दर्शावली आहेत. त्याप्रमाणेच विविध प्रणाली जसे की नियंत्रणकेंद्र, दस्तावेज प्रणाली "ऑक्युलर", व दस्तावेज प्रबंधक "डॉलफिन" पेश केले आहेत. अर्थातच शैक्शणिक प्रणालीही आहेत, व खेळ कोणी विसरू शकेल का?
वापरून बघा की...
आता आपल्याल के.डी.ई. च्या सुधारात मदत करायची असेल अथवा केवळ वापरून बघायचे असेलच! बर्याच लिनक्स वितरकांनी कळविले आहे की त्यांच्या मार्फत के.डी.ई. ४ लवकरच मिळेल. यांची अवगत माहिती इंटरनेट वर के.डी.ई. ४.० माहिती सापडेल. तसेच येथे प्रणाली सोर्स, संगणक सुरक्षा, इत्यादि माहिती पण असते.
के.डी.ई. ४ उपलब्ध करणारे वितरकः
- आर्कलिनक्सचे तपासणी रूप लवकरच उपलब्ध होईल, व पूर्ण रूप साधारण १ महिन्यात मिळेल.
- फेडोरा च्या नौव्या आवृत्ती मधे के.डी.ई. ४ असेल, साधारणतः एप्रिल मधे, तर तपासणी रूप साधारणतः २४ जानेवारीला उपलब्ध होईल. सध्या के.डी.ई. ४ फेडोराच्या रॉहाईड संग्रहात आहे.
- गेन्टू लिनक्स त्यांच्या http://kde.gentoo.org वेबसाईटवर के.डी.ई. ४ उपलब्ध करतात.
- उबुंतूनी त्यांच्या नवीन आवृत्ती - हार्डी हेरॉन (८.०४) - मधे के.डी.ई. ४ सामिल केले आहेच. शिवाय त्यांच्या प्रचलित आवृत्तीसाठी अपडेट दिला आहे. लाईव्ह सी.डी. (अर्थात सी. डी. वरून) उबुंतू चालवायचे असल्यास त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अधिक माहिती त्यांच्या घोषणेत मिळेल.
- ओपन सूसे साठी सुद्धा उपलब्ध आहे. आवृत्ती १०.३ साठी त्वरित मिळवा तसेच आ. १०.२ साठी उपलब्ध आहे, शिवाय लाईव्ह सी.डी. पण आहे. ओपन सूसेच्या आ. ११.० मधे के.डी.ई. ४ असेल.
के.डी.ई. ४ संबंधित माहिती
के.डी.ई. ४ या आधुनिक मुक्त सॉफ्टवेअर डेस्कटॉपमधे सर्वसाधारण तसेच विशेष वापरासठी प्रणालींचा समावेष आहे. कॉंकरर इंटरनेट व डेस्कटॉप एकत्र आणून दोन्हीचा वापर सरल करतो. याबरोबरच प्लाझमा (डेस्कटॉप फलक), डॉलफिन (दस्तावेज प्रबंधक), ऑक्युलर (दस्तावेज प्रणाली) व नियंत्रणकेंद्र मिळून प्राथमिक डेस्कटॉप पूर्ण होतो.
के.डी.ई. चा पाया म्हणजेच के.डी.ई. व क्यू.टी. प्रणालीकोष, जापैकी के.आय.ओ. मार्फत साधने व क्यू.टी. द्वारा आधुनिक चित्र-करामती सहजपणे वापरता येतात. फोनॉन व सॉलिड यांमुळे बहुमाध्यमिक तसेच हार्डवेअर-संघटन संरचना सर्व के.डी.ई. प्रणालींना वापरण्याची क्षमता मिळते.
About KDE
KDE is an international technology team that creates free and open source software for desktop and portable computing. Among KDE's products are a modern desktop system for Linux and UNIX platforms, comprehensive office productivity and groupware suites and hundreds of software titles in many categories including Internet and web applications, multimedia, entertainment, educational, graphics and software development. KDE software is translated into more than 60 languages and is built with ease of use and modern accessibility principles in mind. KDE's full-featured applications run natively on Linux, BSD, Windows, Haiku, and macOS.
Trademark Notices.
KDE® and the K Desktop Environment® logo are registered trademarks of KDE e.V..
Linux is a registered trademark of Linus Torvalds. UNIX is a registered trademark of The Open Group in the United States and other countries.
All other trademarks and copyrights referred to in this announcement are the property of their respective owners.
Press Contacts
For more information send us an email: press@kde.org